उस्ताद

उस्ताद

द्यायची राहून गेली दाद तेव्हा
घेतला होता कुठे आस्वाद तेव्हा!

तू जराही ऐकले नाहीस माझे
रंगली होतीस तू की वाद तेव्हा?

उजळलेल्या झोपड्यांची रोषणाई
पेटले होते कुठे प्रासाद तेव्हा?

धूर्त वारा लागला कानास माझ्या
ऐकली नाही तुझी मी साद तेव्हा

सांगतो, ऐका! लबाडी लांडग्याची
माणसे नव्हती बरे वस्ताद तेव्हा!

पंख मोठे काय फुटले कल्पनेला
हाय! सारे शब्द झाले बाद तेव्हा  

गायचो मी चुंबनांची गोड गाणी
लागला ओठास होता नाद तेव्हा

जमवले होते जरी मी भाट सारे
व्हायचे होते मला उस्ताद तेव्हा!

ही गझल फार आधी लिहिली होती आणि इतरत्र प्रकाशित केल्याचे आठवते आहे. आज आठवली आणिइथे द्यावीशी वाटली.
गझल: 

प्रतिसाद

सुरेख.
हे शेर  भलतेच  आवडले-
धूर्त वारा लागला कानास माझ्या
ऐकली नाही तुझी मी साद तेव्हा

सांगतो, ऐका! लबाडी लांडग्याची
माणसे नव्हती बरे वस्ताद तेव्हा!

गायचो मी चुंबनांची गोड गाणी
लागला ओठास होता नाद तेव्हा...

एक  शेर  माझाही-
"बोलणे  शब्दातले  संपून  गेले,
रंगला  माझा-तुझा  संवाद  तेव्हा..."

 

सांगतो, ऐका! लबाडी लांडग्याची
माणसे नव्हती बरे वस्ताद तेव्हा!

सुंदर..!

लांडगा आणि वाद हे शेर फार आवडले!

लांडग्यांचा शेर छान.

वस्ताद शेर छान.
या गझलेची संकल्पना नक्की कशामुळे सुचली?
कलोअ चूभूद्याघ्या

सांगतो, ऐका! लबाडी लांडग्याची
माणसे नव्हती बरे वस्ताद तेव्हा!
वा

जमवले होते जरी मी भाट सारे
व्हायचे होते मला उस्ताद तेव्हा!
वा.

हे दोन शेर जबराट.

ॐकार,
वस्ताद,उस्ताद गझल!
जयन्ता५२

जमवले होते जरी मी भाट सारे
व्हायचे होते मला उस्ताद तेव्हा!

छान !