मान्यवरांची गझल-डॉ.राम पंडित

कोठून ही  पहाटे अलवार साद आली
कोमेजल्या कळ्यांची अलगद फुले ग झाली


छेडून शब्द गेले ,जाणीव पाकळ्यांना
तरळून श्वास गेले,स्वप्ने दवात न्हाली


सुख थांब सांगताही ना थांबले ग दारी
घेऊन त्यास संगे ,आशा पहा निघाली


ऋतु संपले तनाचे कळले मलाच नाही
पण सांज सावल्यांना माझी व्यथा न भ्याली


शिवलेत ओठ माझे यंदाच या युगाने
जगता, तरी कथा ती गझलेत या निमाली


आला वसंत कैसा, शिशिरात या मनाच्या
सुखवाट आज जेव्हा, क्षितिजाकडे निघाली


 

गझल: 

प्रतिसाद

सुख थांब सांगताही ना थांबले ग दारी
घेऊन त्यास संगे ,आशा पहा निघाली


ऋतु संपले तनाचे कळले मलाच नाही
पण सांज सावल्यांना माझी व्यथा न भ्याली
खूपच आवडले. फक्त 'ग' म्हणजे कोण अन तिचा सुख न थांबण्याशी काय संबंध एवढे समजले नाही. नेहमीचाच प्रॉब्लेम!
 

सुख थांब सांगताही ना थांबले ग दारी
घेऊन त्यास संगे ,आशा पहा निघाली              'ग' हा स्त्रीमुखीचा सहज उच्चार आहे.
ऋतु संपले तनाचे कळले मलाच नाही
पण सांज सावल्यांना माझी व्यथा न भ्याली
आला वसंत कैसा, शिशिरात या मनाच्या
सुखवाट आज जेव्हा, क्षितिजाकडे निघाली
हे तीनही आवडले. अलगद हाताळणी.
कलोअ चूभूद्याघ्या