इच्छा ..

पुन्हा भेट घेण्या पुन्हा आठवावे
बसाव्यात गाठी नि गुंते सुटावे


तुझे ध्येय गगनात घेण्या भरारी
तुझ्या आठवांना तुझे पंख यावे


जशी काच असते पुढे आणि मागे
तुला मी - मला तू तसे ओळखावे


चमकले सितारे नभीचे हजारो
कसे गीत धरतीवरी आळवावे ?


पुरे जाहले रे तुझे तेच रडणे
अता मी वदावे तसे तू करावे


जशी शर्करा एक पाण्यात होते
तसे श्वास माझे-तुझे एक व्हावे

गझल: 

प्रतिसाद

'गुंते' छान. पण, 'काच' फारच छान. फारच.

 
व्वा...छान..
पुन्हा भेट घेण्या पुन्हा आठवावे
बसाव्यात गाठी नि गुंते सुटावे

जशी काच असते पुढे आणि मागे
तुला मी - मला तू तसे ओळखावे

काच आणि सितारे हे शेर चांगले आहेत.