पुन्हा...

कळले जमीन नांगरायला पुन्हा हवी...
हृदयांत वेदना उगायला पुन्हा हवी


होती सुखात थंड भावना, अता कळे...
दु:खे अजून पांघरायला पुन्हा हवी


बोटे धरून चालती लहानगी मुले...
पण प्रेयसी तशी सुटायला पुन्हा हवी


शस्त्रें मनास छेदुनी अभंग गायली...
ओवी तशीच आळवायला पुन्हा हवी


जपली जुन्या-नवीन खेळण्यांत भावना...
ती माणसांत आज यायला पुन्हा हवी

गझल: 

प्रतिसाद

आवडलेले आहेत. एकदमच.

अजय,
भन्नाट!
कळले जमीन नांगरायला पुन्हा हवी...
हृदयांत वेदना उगायला पुन्हा हवी

होती सुखात थंड भावना, अता कळे...
दु:खे अजून पांघरायला पुन्हा हवी
दोन्ही शेर सुंदर!
मला माझा एक शेर आठवला!
चला पुन्हा मनास दु:ख पांघरायला चला
दिशा पहाटल्यात सत्य अंथरायला चला
वृत्त पण आवडले. छान!

या खयालाने तिलकधारीला मजा आली.
प्रेयसी मिळायला हवी म्हणुन अर्धे जग वेडेपिसे असते. ( उरलेले अर्धे प्रेयसी म्हणुन वावरते )
इथे प्रेयसी सुटायला हवी आहे. वा वा! छान!
तिलकधारीला मजा आली. वेगळाच खयाल!