मान्यवरांची गझल-डॉ. संतोष कुलकर्णी

तेच  ते,तेच  ते, सांगतो-
का  तुझ्याशी  असा  वागतो?

ऐकुनी ही  तुझे  ,तेच  ते...
का  मनाशी  हसू  लागतो...?

दे  तुझा  हात , अन  साथ ही...
मागणे  सारखे  मागतो...

चांदणे  वेचतो , चंद्र  हा...
मी   उगा  पाहतो , जागतो...

सावलीला  तुझ्या , मी  उभा
पावलांशी  तुझ्या  रंगतो...

मागतो  चंद्र  मी  तेवढा...
...काय  आभाळ  मी  मागतो,

फूल  तू-!  भोवती  मी  तुझ्या
मुक्त  गंधापरी  पांगतो...

 

गझल: 

प्रतिसाद

एक अत्यंत साधी गझल असे माझ्यामते या गझलेचे वर्णन करता येईल. मुळात लहान वृत्त घेतल्यामुळे 'खूप काही सांगणे' यावर मर्यादा येतातच. पण जे काही सांगीतले आहे त्यातही नावीन्याचा अभाव जाणवला. अर्थातच संतोष साहेब राग मानणार नाहीत अशी आशा आहे.
उदाहरणार्थः दुसरा शेरः
ऐकुनी तेच ते ते तुझे
का मनाशी हसू लागतो?
यात प्रिया तेच ते सांगते त्यामुळे हसू येणे यातून ती काय सांगत असावी याचा जर अंदाज केला तर बहुधा ती प्रणयोत्सूक असावी किंवा नकार देत असावी यापैकी एक वाटते. प्रणयोत्सूक असल्यास हसू येणे ठीक आहे, पण ती काही तीव्र भावना ठरत नाही. नकार देत असल्यास ( एकंदर प्रेमालाच ) 'रडू लागतो' शोभावे.
अर्थात, तेच तेच ते सांगणारी व्यक्ती 'प्रेयसी' नसेलच तर वेगळी गोष्ट आहे.

विषय ठीक. नावीन्य एकंदर गझलेत असलेच पाहिजे असे माझे मत नाही. पण...
दे  तुझा  हात , अन  साथ ही...
मागणे  सारखे  मागतो...
चांदणे  वेचतो , चंद्र  हा...
मी   उगा  पाहतो , जागतो...
सावलीला  तुझ्या , मी  उभा
पावलांशी  तुझ्या  रंगतो...
फूल  तू-!  भोवती  मी  तुझ्या
मुक्त  गंधापरी  पांगतो..
हे तसे एकाच पद्धतीचे वाटतात.
कलोअ चूभूद्याघ्या