गंधार


चांदणे भासे जरी अंधार आता
मागती गात्रे सखी श्रूंगार आता  

सावली चंद्रावरी कोठून आली
मोकळा केलास तू संभार आता

धुंद गंधाने खूळा बेभान वारा
रातराणी चेतवी अंगार आता

कोणती आहे तुझ्या स्पर्शात जादू
डोलती का संयमी मंदार आता

श्वास झाले सूर माझे तापलेले
पैंजणे गाती तुझी गंधार आता


गझल: 

प्रतिसाद

सर्वच.

सावली चंद्रावरी कोठून आली
मोकळा केलास तू संभार आता
व्वा!
कलोअ चूभूद्याघ्या

भावनांची तीव्रता अन श्रुंगाराचे मर्यादीत वर्णन असणे हे 'गझल' ही काव्यप्रकाराची वैशिष्ट्ये आहेत असे समजले जाते. त्या निकषांवर ही गझल मागे पडते. मात्र वृत्त, शब्दांची निवड अन वातावरण निर्मीती यात श्रेष्ठ वाटते.
तसेच, उपमांमध्ये व कल्पनांमध्ये नावीन्य आणणे हे गझलकारांच्या पिढ्यांचे कर्तव्य असायला पाहिजे. म्हणजे, जर २० वर्षापुर्वीच्या गझलकाराने 'केशसंभार' मोकळा झाल्याने सावली पडली अशी कल्पना मांडली, तर २० वर्षानंतरच्या गझलकाराने 'मी लोकांना दिसत नाही कारण तिच्या केसांची माझ्यावर सावली पडली आहे' अशी 'चंद्राची' तक्रार असल्याचे नमूद केल्यास एकंदर काव्य जरा पुढे सरकावे.

 

वा..वा..छान....
सुरेख

सावली चंद्रावरी कोठून आली
मोकळा केलास तू संभार आता

सावली चंद्रावरी कोठून आली
मोकळा केलास तू संभार आता

धुंद गंधाने खूळा बेभान वारा
रातराणी चेतवी अंगार आता

कोणती आहे तुझ्या स्पर्शात जा 
डोलती का  संयमी  मंदार आता