काय या छातीत श्वासाला मिळे

रे नका येऊ कुणीही मोडता घालायला
चाललो आहे स्वतःला आज मी समजायला


वासना, हेवा, अनीती, स्वार्थ, लाचारी, दगा
जन्म गेला 'काय आहे मी' मला उमगायला


चारचौघांसारखा हा देह आहे लाभला
चारचौघे त्यामुळे येतील खांदा द्यायला


विश्व हे माझ्याचसाठी निर्मिले आहेस का?
सारखा जातो कसा मी फायदा काढायला?


मी तरी आहे मला हेही तसे आहे बरे
अन्यथा आहे कुणाचा कोण येथे च्यायला!


काय या छातीत श्वासाला मिळे, समजेचना
येत जातो जायला अन जात राही यायला


इंद्रियांच्या मागण्या होतील पुरत्या त्या दिनी
वाटते, होईन मीही मोकळासा जायला


 


 


 


 


 


 


 


 

गझल: 

प्रतिसाद

विचार वाटतात. लिहिण्याची पद्धत फार सुंदर.
मी तरी आहे मला हेही तसे आहे बरे
         या ओळीत बदल करण्याला वाव आहे.
च्यायला च्या आधी ? हवे होते का??
तसेच -  'काय आहे मी' - चे वेगळेपण जाणवायला हवे असे वाटते.
कलोअ चूभूद्याघ्या

गझल हे पद्य असते. सरळ विधानांची मालिका नाही.