विदूषक

हा बंद ही, यशस्वी, छापा पुन्हा रकाने
आम्हास ही जगू द्या, का बंद कारखाने ?


वेडे कसे तुम्ही हो, अर्धाच वार केला
शोधीन मी तुम्हाला, आता कसा दमाने


आधी मला कळू दे, जे प्राक्तनात आहे
करतोस तू  कशी रे,  ओली सुकी मुक्याने ?


व्हा दूर कुडमुड्यांनो, सांगू नका जराही
काढून ठेवलेले, आधीच पोपटाने


काही थरार नाही, साधे सुधेच सगळे
पाकीट ही लुटावे, साध्याच चोरट्याने ?


डोळ्यात आज पाणी, देतात का चिठोरे ?
वेडाच एक त्याची, फ़ाडून टाक पाने


निर्व्याज हासण्याचा, ध्यानात अर्थ आला
डोळे खरेच ओले, केले विदूषकाने

गझल: 

प्रतिसाद

 पाकीटाचा शेर आवडला.
 

वा!
प्रसाद,
आपली गझल वाचून कोणाचीतरी आठवण येते आहे. कोणाची ते नक्की नाही सांगता येणार.
कलोअ चूभूद्याघ्या

शोधीन मी तुम्हाला, आता कसा दमाने...या ओळीत 'कसा'च्या ऐवजी 'पहा' बरे वाटेल की नाही?
ते असो. एक भलताच गोंधळ केलायत.
मतल्यात 'काने' आल्यावर इतरत्र काय वाट्टेल ते काय घेता?
२३०० रुपयाला एक पोत्यासारखी पिशवी मिळते फर्निचरच्या दुकानांमधे. तिच्यात जसा माणूस बसेल तसा तिचा आकार होतो. गझल म्हणजे तशी खुर्ची वाटली काय?

प्रिय मित्र अजय?
कोणाची आठवण येत आहे हे नक्की सांगता येणार नाही म्हणजे काय?
आपण अंदाज सांगुन टाकावा, नाही का?
तिलकधारी सांगेलच, अंदाज चूक आहे की बरोबर ते!

तिलकधारीजी : काफ़ियामधला घोळ लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. मतला बदलला आहे
कुडमुड्याच्या शेरात छोटासा बदल केलेला आहे
एक शेर वाढवला आहे
श्री : अजय जोशी - कोणाची आठवण येत आहे ?  मला काही समजले नाही

व्वा..व्वा..
व्हा दूर कुडमुड्यांनो, सांगू नका जराही
काढून ठेवलेले, आधीच पोपटाने
काही थरार नाही, साधे सुधेच सगळे
पाकीट ही लुटावे, साध्याच चोरट्याने ?

डोळ्यात आज पाणी, देतात का चिठोरे ?
वेडाच एक त्याची, फ़ाडून टाक पाने
निर्व्याज हासण्याचा, ध्यानात अर्थ आला
डोळे खरेच ओले, केले विदूषकाने

व्वा..व्वा..
व्हा दूर कुडमुड्यांनो, सांगू नका जराही
काढून ठेवलेले, आधीच पोपटाने
काही थरार नाही, साधे सुधेच सगळे
पाकीट ही लुटावे, साध्याच चोरट्याने ?

डोळ्यात आज पाणी, देतात का चिठोरे ?
वेडाच एक त्याची, फ़ाडून टाक पाने
निर्व्याज हासण्याचा, ध्यानात अर्थ आला
डोळे खरेच ओले, केले विदूषकाने