जाळशील का तू?

अश्रु तुझे मनावर या ढाळशील का तू?
माझ्या मनास नाहीतर जाळशील का तू?


तक्रार मोगरा करतो, 'स्वस्त हा किती मी!'
किंमत तयास देण्या, तो माळशील का तू?


देणार ना तुला मी स्वप्नात त्रासही पण
रात्रीस झोपणे आधी टाळशील का तू?


तू नावं भेटलेल्यांची सांगशील जेव्हा
माझेच नाव तेव्हाही गाळशील का तू?


कंटाळलो नव्या वचनांना तुझ्या अता मी
ते मागचेच वचन आधी पाळशील का तू?


आरोप हा तुझा की आहे खट्याळ मी....पण
आधी पदर तुझा तो सांभाळशील का तू?


ही रात्र संपण्याच्या बाकी अजून वेळा
गातो अता गझल ही, कंटाळशील का तू?


ह्रषिकेश चुरी

गझल: 

प्रतिसाद

आरोप हा तुझा की आहे खट्याळ मी....पण
आधी पदर तुझा तो सांभाळशील का तू?
छान.

या रचनेत सहजता नाही. ओळी सहजपणे म्हणता, गुणगुणता येत नाही.  वरील द्विपदीतल्या ओळींसारख्याच वृत्त (ताराप, राधिका, गा| ताराप, राधिका , गा किंवा गागालगालगागा दोनदा) सांभाळले तर उत्तम.

श्री चुरीसाहेब,
भटसाहेबांनी आपल्याला वृत्ताबद्दल सांगीतलेच आहे. माझ्यामते आपण ही रचना संपादीत करावीत. कारण त्याच्यातील मुद्दे चांगले आहेत. वृत्तात नाही असा ठपका बसण्यापेक्षा संपादीत करणे उत्तम ठरेल. 'वचन' हा शेर अतिशय सुंदर आहे. बोलल्याबद्दल राग मानू नये.
धन्यवाद!