पूजा

तन  मन  वचने  आवर  सखये
ती  राधेची  घागर  सखये

तुझे  उमलणे  माझे  असता
जळू  कशाला  तुजवर  सखये ?

जेथे  पूजा  तिथेच  असतो
कळ्याफुलांचा  वावर  सखये

कुणी  गुरू  ना  कुणी  लघू  ही
तयातून  घे  सुन्दर  सखये

संस्कृतीतले   प्राकृत  शोधू
जरी  जाहलो  नागर  सखये

तापव  लोणी  घृत  मिळवाया
तपावीन  ना  अम्बर  सखये

प्रथा  रुढींची  पिके  घ्यावया
का  हृदयावर  नांगर  सखये ? 

गझल: 

प्रतिसाद

पूजा आवडले. पण सुनेत्रा पूजेसाठी फुले मी सुद्धा घेते , कळ्या कशाला? कळ्या कोणी वाहते का?
इतरही चाग्ले वाटले.

सन्माननीय सुनेत्रा सुभाष,
माफ करा, पण आपली ही गझल मला समजली नाही.
आपण कदाचित म्हणाल की जर समजली नाही तर प्रतिसाद द्यायचा कशाला?
पण माझे म्हणणे असे आहे की संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या गोष्टीवर प्रतिसाद देऊ शकणे ही लोकशाही आहे.

दोन्ही शेर आवडले
तुझे उमलणे माझे असता
जळू कशाला तुजवर सखये ?

जेथे पूजा तिथेच असतो
कळ्याफुलांचा वावर सखये

झकास!
वावर झकास!
आवडला!