मी तुझा (सुधारीत)

केवढा एकांत होता भेटली होतीस जेंव्हा
आणि सारे भरुन गेले चालली होतीस जेंव्हा

श्वास जेथे घेतला तू बाग तेथे बहरली की...
गंध माझा घेवुनीया नाहली होतीस जेंव्हा

मी तुला तर त्या सकाळी ओळखूनी 'खास' गेलो
दर्पणा पाहून अलगद लाजली होतीस जेंव्हा

सूर्य नव्हता, चंद्र नव्हता, ज्योतही नव्हती तरीही..
चमकल्या दाही दिशा तू जागली होतीस जेंव्हा

स्वप्न माझे पूर्ण झाले की तुला जिंकायचे, तो -
देह माझ्या बाहुपाशी हारली होतीस जेंव्हा

मी तुझा झालो क्षणातच, हारलो होतो क्षणातच
'मी'पणाची कात सहजी टाकली होतीस जेंव्हा

 

पूर्वी मी ही गझल दिलेली होती. मात्र मा. चित्तरंजन यांनी या वृत्तात लिहून पहा असा सल्ला दिला. मला तो पटला म्हणून पुन्हा थोडे बदल करून देत आहे.



गझल: 

प्रतिसाद

चमकल्या दाही दिशा तू जागली होतीस जेव्हा...
सुंदर शेर अजय,
गझल छानच आहे.