शापीत

 तो घाव हृदयातला,नाही दुखावणारा
थोडाच त्रासणारा,भलता लुभावणारा.


काही न सांगता तू ,मज समजली कहाणी
होता तुझा उसासा,सारेच सांगणारा.


त्याचा नको करु तु,छाती पिटुन धावा
शापीत देव इथला,कोणा न पावणारा.शोकात फार इतका,परिवार तो बुडाला
 त्यांच्या घरात मेला,कोणी कमावणारा.होण्यास राख मी ही,भलता अतुर होता
जळले स्मशान,उरलो, मी फक्त पाहणारा.


हे चंद्र सूर्य तारे त्यांच्यात एक मीही
सारेच धावणारे,कोणी न थांबणारा.


----- योगेश जोशी

गझल: 

प्रतिसाद

आपली गझल दिसली नाही म्हणुन 'गझल' या शब्दावर क्लिक केले अन दिसायला लागली. मग ती मुद्दाम इथे पेस्ट केली. आपले काही काही शेर खरच सुंदर आहेत. पण आपल्याला वाईट वाटणार नाही व गैरसमज होणार नाही या आशेने मी मला जाणवणार्‍या काही बाबी ठळक करुन दाखवल्या आहेत. कृपया राग मानू नये. माझ्या मनापासून शुभेच्छा!
उसासा शेर फार सुंदर आहे. मतल्यामधे 'हृदयातला' हा शब्दम्हणायला थोडेसे अवघड जात आहे. शापीत देव ही कल्पना फारच नावीन्ययुक्त. सुंदर शेर आहे.
तो घाव हृदयातला,नाही दुखावणारा
थोडाच त्रासणारा,भलता लुभावणारा.
काही न सांगता तू ,मज समजली कहाणी
होता तुझा उसासा,सारेच सांगणारा.
त्याचा नको करु तु ( तू ),छाती पिटुन धावा (टू )
शापीत देव इथला,कोणा न पावणारा.
शोकात फार इतका,परिवार तो बुडाला
त्यांच्या घरात मेला,कोणी कमावणारा. ( हा शेर साधा वाटतो )
होण्यास राख मी ही,भलता अतुर होता ( तो )
जळले स्मशान,उरलो, मी फक्त पाहणारा.
हे चंद्र सूर्य तारे त्यांच्यात एक मीही
सारेच धावणारे,कोणी न थांबणारा.
धन्यवाद.

गझल चुकुन Teaser विभागात पोस्ट केली गेली होती. त्यामुळे ती नव्या गझलांच्या विभागात दिसली नाही.(मी ही  खरेतर बुचकळ्यात पडलो होतो...विचाराधीन विभागात पण नाही आणि इथे पण नाही.मग गझल गेली तरी कुठे?.. :))
आपल्या सगळ्या मतांचा आणि सूचनांचा आदर करतो...
क.लो.अ.
योगेश जोशी.

 कवी योगेश,
पावणारा, कमावणारा, पाहणारा अन थांबणारा या शेरांबाबत - या शेरांचे रूप गद्याकडे झुकणारे आहे. या शेरांमधे काही बदल करून ते पुन्हा प्रकाशित केल्यास आपली गझल आणखीन भाव खाऊन जाईल असा आमचा अंदाज!
तसेचः शेरामधे नुसतेच पद्य आणण्यापेक्षा त्यातील अर्थाचा जो एक 'सरळपणा ' आहे तो जरा तिरका केला ( विरोधाभास, उपमा, भावनांची तीव्रता वगैरे आणुन ) की रचना खूप जास्त भावेल.
सध्या त्यातील उसासा ह शेर चांगला आहे.
 
 
तो घाव हृदयातला,नाही दुखावणारा
थोडाच त्रासणारा,भलता लुभावणारा.


काही न सांगता तू ,मज समजली कहाणी
होता तुझा उसासा,सारेच सांगणारा.


त्याचा नको करु तु,छाती पिटुन धावा
शापीत देव इथला,कोणा न पावणारा.शोकात फार इतका,परिवार तो बुडाला
 त्यांच्या घरात मेला,कोणी कमावणारा.होण्यास राख मी ही,भलता अतुर होता
जळले स्मशान,उरलो, मी फक्त पाहणारा.


हे चंद्र सूर्य तारे त्यांच्यात एक मीही
सारेच धावणारे,कोणी न थांबणारा.