पुन्हा पुन्हाआठवे मला तिचे लाजणे पुन्हा पुन्हा
वेचुनी फुलांस ते माळणे पुन्हा पुन्हा

रोज हेच व्हायचे पाहता क्षणी तिला
बोलणे कसेबसे हासणे पुन्हा पुन्हा

रोखली किती जरी याद रोज यायची
अन असेच रोज मी जागणे पुन्हा पुन्हा

या जगात सारखा त्रास सोसला किती?
आसवे अशीच मग ढाळणे पुन्हा पुन्हा

खेळते जिथे तिथे सावली तिची पहा
का असे मला तिचे भासणे पुन्हा पुन्हा?

-- स्नेहदर्शन शहा

प्रतिसादरोज हेच व्हायचे पाहता क्षणी तिला
बोलणे कसेबसे हासणे पुन्हा पुन्हा
सुंदर...


खेळते जिथे तिथे सावली तिची पहा
का असे मला तिचे भासणे पुन्हा पुन्हा?
छान...
गझललेखनाला अगदी मनापासून शुभेच्छा.