कसले माझे ? कुठले अपुले ? ते परकेच निघाले !
ज्यांनी धीर दिला , ते माझे कोण न जाणे होते ?
तोडले संबंध इतके जाहले

तोडले संबंध इतके जाहले
आणखी डोकयातले तण वाढले
काळ हा इतिहास हा की दु:ख हे
आपल्या वर्षांमधे जे तुंबले
व्हायचे जे तेच झाले शेवटी
केवढे जन्मावरी घण घातले
येथुनी मागे न काही या पुढे
हे कुठे येऊन जीवन थांबले
रंग नाही राहिला दुनियेत की
आपल्या रक्तात पाणी साचले
सावल्यांनो संपवा आतातरी
वैर जे आजन्म होते पाळले....
-- अनंत ढवळे
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.

प्रतिसाद
उत्तम...
येथुनी मागे न काही या पुढे
हे कुठे येऊन जीवन थांबले
छान...
रंग नाही राहिला दुनियेत की
आपल्या रक्तात पाणी साचले
उत्तम...