प्राणात तुला जपले....

प्राणात तुला जपले मी डोळ्यात न येऊ देता
गुणगुणतो गीत तुझे मी ओठात न येऊ देता

रडलो तर रडलो ऐसा कळलेच कुणाला नाही
हसलो तर हसलो हासू गालात न येऊ देता

(यासाठी मंदिर मस्जिद गरजेचे वाटे त्यांना
देवाला पुजता येते हृदयात न येऊ देता)

पाजावे जहर कुणाला हातून तुझ्या पाजावे
शंकेचा गंध जराही जहरात न येऊ देता

भरणार कधी ना ऐशा का झाल्या असत्या जखमा
जर डाव उधळला असता रंगात न येऊ देता

ज्या रातीसाठी केल्या बरबाद हजारो राती
काळाने नेले मजला ती रात न येऊ देता

प्रतिसाद

फारच उत्तम शेर आहेत. मजा आली.
(यासाठी मंदिर मस्जिद गरजेचे वाट त्यांनादेवाला पुजता येते हृदयात न येऊ देता)


पाजावे जहर कुणाला हातून तुझ्या पाजावेशंकेचा गंध जराही जहरात न येऊ देता


भरणार कधी ना ऐश्या का झाल्या असत्या जखम्याजर डाव उधळला असता रंगात न येऊ देता


ज्या रातीसाठी केल्या बरबाद हजारो रातीकाळाने नेले मजला ती रात न येऊ देता

गालात, हृदयात आणि रात हे शेर जबरदस्त आहेत!

छान शेर आहेत.
शेर  वाचकाच्या शेवट लक्षात येऊ न देता किंचित् चकवा देऊन पूर्ण होतात.  ः)

सबकुछ बहोत खुब !क्या बात है !

प्राणात तुला जपले मी डोळ्यात न येऊ देता
गुणगुणतो गीत तुझे मी ओठात न येऊ देता
मस्त...
भरणार कधी ना ऐशा का झाल्या असत्या जखमा
जर डाव उधळला असता रंगात न येऊ देता
वा...वा...वा...

शुभेच्छा.

मी हि गझल पुर्वी लातुर येथे ऐकलि आहे....
पन आज येथे ही गझल पाहुन आनन्द झाला
अप्रतीम गझल आहे.........

धन्यवाद.....

प्रतिसादाबद्दल सर्वा॑चे मनापासून धन्यवाद.....