खरे सांगतो




मनाप्रमाणे माझ्या जगलो,खरे सांगतो
तसा कुणा नाही आवडलो,खरे सांगतो

किती दिसांनी शिरलो होतो घरात माझ्या
अनोळखी नजरा,घाबरलो,खरे सांगतो

बघून आलो मीही जेव्हा उजाड गावे
पुढ्यातल्या दु:खाला हसलो,खरे सांगतो

मेले होते कुणी वाटते उघड्यावरती
बघावयाला होतो जमलो,खरे सांगतो

निघून गेले पुढे सोबती खाऊन माझे
इथेच जागी मी साकळ्लो खरे सांगतो

--योगेश वैद्य

प्रतिसाद

गझलकाराचे नांव दिसले नाही.
गझल चांगली आहे. मेले होते उघड्यावरती कोणी हा शेर चांगला आहे.

'खरे सांगतो' या रदीफवरून ही गझल आठवली.
फिर हाथमे शराब है सच बोलता हुं मै
ये चीज लाजवाब है सच बोलता हुं मै
गिनकर पियोगे जाम तो होता नही नशा
मेरा अलग हिसाब है सच बोलता हुं मै
साकी यकीं ना आये तो गर्दन झुकाके देख
शीशे मे माहताब है सच बोलता हुं मै
हाथोंमे एक जाम है, होठोंपे एक गझल
बाकी खयालोख्वाब है सच बोलता हुं मै
 

 

गजल आवडली. पहिले दोन शेर विशेष आवडले.
अजब



किती दिसांनी शिरलो होतो घरात माझ्या
अनोळखी नजरा,घाबरलो,खरे सांगतो
सुंदर कल्पना...सुंदर.


बघून आलो मीही जेव्हा उजाड गावे
पुढ्यातल्या दु:खाला हसलो,खरे सांगतो
वा...वा...वा...

मेले होते कुणी वाटते उघड्यावरती
बघावयाला होतो जमलो,खरे सांगतो
छान...