हुंदका उरातच गोठवायचा आहे

हुंदका उरातच गोठवायचा आहे
हा त्रास मला कोळून प्यायचा आहे

चालला कुठे हा कळप झुरत हरणांचा
का , पुढे 'सुखांचा झरा' यायचा आहे

कोरंट तरी आपली फुलुन येते का
अन् तुला नवा फुलबाग घ्यायचा आहे

"नागरीक"चा एवढा अर्थ आहे की
हा देश मलाही वाचवायचा आहे

तो समोर ठेविल वेगवेगळ्या इच्छा
तू तुझा इरादा ओळखायचा आहे

बोलवेन तेव्हा काम टाकुनी ये तू
बस् तुला ....एक झोकाच द्यायचा आहे

लागेल मला ज्या क्षणी झोप जन्माची
विठ्ठला तुला 'पाळणा' गायचा आहे

~वैवकु

गझल: 

प्रतिसाद

चालला कुठे हा कळप झुरत हरणांचा
का , पुढे 'सुखांचा झरा' यायचा आहे

तो समोर ठेविल वेगवेगळ्या इच्छा
तू तुझा इरादा ओळखायचा आहे

हे दोन शेर विशेष. मतलाही छान आहे. 'नागरीक'वाला शेर विशेष भावला नाही. विचार उदात्त आहे मात्र.

तो समोर ठेविल वेगवेगळ्या इच्छा
तू तुझा इरादा ओळखायचा आहे

मस्त. विचारांमधे अधिक स्पष्टता यावी ह्यावर काम व्हायला हवे वैभव!

इतक्या सुंदर गझलेवर , ''ही गझलच नाही '' अशी मल्लिनाथी एकाने केली आहे. माझी प्रशासकांस विनंती आहे की आपण या मल्लिनाथीवर काही भाष्य करावे. मी हा विषय अनाठायी येथे घेतो आहे,असे वाटल्यास क्षमस्व,माझा प्रतिसाद मी पुसून टाकेन.

सर्वांचे अंतःकरणपूर्वक आभार

ही गझल नाही असे म्हणण्यास काहीही सयुक्तिक कारण दिसत नाही.

गझल आवडली.

चालला कुठे हा कळप झुरत हरणांचा
का , पुढे 'सुखांचा झरा' यायचा आहे

तो समोर ठेविल वेगवेगळ्या इच्छा
तू तुझा इरादा ओळखायचा आहे

छान आहे

तो समोर ठेविल वेगवेगळ्या इच्छा
तू तुझा इरादा ओळखायचा आहे लय आवडला

बोलवेन तेव्हा काम टाकुनी ये तू
बस् तुला ....एक झोकाच द्यायचा आहे

Sundar sher. Gazal aavadalee.

नवीन प्रतीसादाकांचे मन:पूर्वक आभार