सांगतो प्रत्येक जण गर्दीतला.....


मी उसनवारी करुन जो आणला
एक दिवशी  धीर तो ही संपला

वेगळे अस्तित्व आहे आपले
सांगतो प्रत्येक जण गर्दीतला

वाटते आयुष्य जे ही पाहिले
एक निव्वळ भास होता आपला

रोड हा जातो जुन्या शहराकडे
राहतो जेथे कुणी माझ्यातला

जूनच्या महिन्यातला पाऊस तू
आणि माझा जन्म वैशाखातला........

अनंत ढवळेगझल: 

प्रतिसाद

अनंत, 
पहिले चार शेर आवडले. सणसणीत चौकार !

मी उसनवारी करुन जो आणला
एक दिवशी  धीर तो ही संपला

वेगळे अस्तित्व आहे आपले
सांगतो प्रत्येक जण गर्दीतला

वाटते आयुष्य जे ही पाहिले
एक निव्वळ भास होता आपला

रोड हा जातो जुन्या शहराकडे
राहतो जेथे कुणी माझ्यातला

शेवटचा फटका पारंपरिक. सरळ बॅटने चेंडू गोलंदाजाकडे परत. 


 

रोड हा जातो जुन्या शहराकडे
राहतो जेथे कुणी माझ्यातला

जूनच्या महिन्यातला पाऊस तू
आणि माझा जन्म वैशाखातला......... आवडलेत
रोड हा शब्द योजण्या मागचे काही विशेष प्रयोजन आहे का?.. मार्ग किंवा वळण असा शब्द-प्रयोग केल्याने आपल्याला अपेक्षित आशयाला बाधा आली असती का?..
-मानस६

पहिले २ शेर फार आवडले!
गर्दीचा शेर तर अप्रतिम आहे...

पहिले दोन शेर खूप आवडले.
सोनाली

सरळ विधाने. नवे काहीच नाही.
कलोअ चूभूद्याघ्या

हा शेर तसा फारच फिजिकल आहे, म्हणजे अगदी हात लाऊन बघता येईल असा...त्यामुळे मार्ग   सारखा शब्द योजून त्याचे भौतिकत्व कमी करू नये असे वाटते...

वेगळे अस्तित्व आहे आपले
सांगतो प्रत्येक जण गर्दीतला
वा!!!

जूनच्या महिन्यातला पाऊस तू
आणि माझा जन्म वैशाखातला........

वा! हा शेर गुणगुणताना मजा येते आहे.

वेगळे अस्तित्व आहे आपले
सांगतो प्रत्येक जण गर्दीतला... मस्त!
शेवटचा  शेरही  आवडला!

जूनच्या महिन्यातला पाऊस तू
आणि माझा जन्म वैशाखातला........

वाह ! सुंदर लहजा आला आहे.

क्या बात है!,

अनन्त,

मी उसनवारी करुन जो आणला
एक दिवशी  धीर तो ही संपलारोड हा जातो जुन्या शहराकडे
राहतो जेथे कुणी माझ्यातला

जूनच्या महिन्यातला पाऊस तू
आणि माझा जन्म वैशाखातला

प्रतिक्रियेला उशिर झाला....

छान गझल!

सान्जेय.

मतला आणी पुढील दोन शेर खूप आवडले....
रोड हा जातो जुन्या शहराकडे
राहतो जेथे कुणी माझ्यातला

जूनच्या महिन्यातला पाऊस तू
आणि माझा जन्म वैशाखातला........

जूनच्या महिन्यातला पाऊस तू
आणि माझा जन्म वैशाखातला........
हा शेर फार फार आवडला :)

अनंतजी,
मस्त गझल! मतला,मक्ता विशेष.

जयन्ता५२

सहमत आहे,मतलाही विशेष.
जयन्ता५२

वाटते आयुष्य जे ही पाहिले
एक निव्वळ भास होता आपला
 
ह्या शेर मधे "आपला" ज्या लहज्यात आला आहे त्याला सलाम .