शेवट लिहलेला असतो सुरुवातीवरती
का विश्वासच उरला नाही छातीवरती
सवलत मागत उठतो जो तो जातीवरती
इंद्रधनूचे रंग तुझ्या जर हातामध्ये
कशी दिसेना हिरवी नक्षी मातीवरती
अलार्म लावुन निवांत झोपी जातो आपण
किती भरोसा असतो अपुला रातीवरती
चला जरा ही सुंदरतेची व्याख्या बदलू
ठरवायाचे कुठवर नुसत्या कातीवरती
इथेच सारे दिले-घेतले वसूल कर तू
मला नको आहेत येथली नाती वरती
आयुष्याची गोष्ट कळाया अवघड नसते
शेवट लिहलेला असतो सुरुवातीवरती
_________________________ शाम
गझल:
प्रतिसाद
केदार पाटणकर
शनि, 23/08/2014 - 10:14
Permalink
वा ....अगदी आवडली गझल.
वा ....अगदी आवडली गझल.
अलार्म लावुन निवांत झोपी जातो आपण
किती भरोसा असतो अपुला रातीवरती
चला जरा ही सुंदरतेची व्याख्या बदलू
ठरवायाचे कुठवर नुसत्या कातीवरती
हे तर छान झाले आहेत.
बेफिकीर
शनि, 23/08/2014 - 10:45
Permalink
मस्तच गझल आहे
मस्तच गझल आहे
विजय दि. पाटील
शनि, 23/08/2014 - 11:16
Permalink
अलार्म लावुन निवांत झोपी जातो
अलार्म लावुन निवांत झोपी जातो आपण
किती भरोसा असतो अपुला रातीवरती
मस्त. जमीनही आवडली
अजय अनंत जोशी
शनि, 23/08/2014 - 19:05
Permalink
आवडली गझल.
आवडली गझल.
मात्र,
अलार्म ऐवजी गजर बसतो का पहा आणि भरोसा ऐवजी भरवसा असावे असे वाटते.
मात्र, गझल छान. भरवसा विशेष.
चित्तरंजन भट
शनि, 23/08/2014 - 21:01
Permalink
अलार्म लावुन निवांत झोपी जातो
अलार्म लावुन निवांत झोपी जातो आपण
किती भरोसा असतो अपुला रातीवरती
वा.
आयुष्याची गोष्ट कळाया अवघड नसते
शेवट लिहिलेला असतो सुरुवातीवरती
वा. दुसरी ओळ विशेष.
बाकी मतल्याला भरपूर दाद मिळेल.
सहच सुचले. केवळ चांगला , उदात्त विचार versify केल्यामुळे तो चांगला शेर होईलच असे नाही. बशीर बद्रचा शेर आहे.
दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे
जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिन्दा न हों
हा उदात्त आणि चांगला विचार आहे.
supriya.jadhav7
रवि, 24/08/2014 - 09:34
Permalink
सगळेच शेर अतिशय आवडले.
सगळेच शेर अतिशय आवडले.
इथेच सारे दिले-घेतले वसूल कर तू
मला नको आहेत येथली नाती वरती
विशेष.
वैभव वसंतराव कु...
मंगळ, 09/09/2014 - 22:19
Permalink
वाह शामजी मस्तच गझल आहे
वाह शामजी मस्तच गझल आहे
वैभव देशमुख
शुक्र, 19/09/2014 - 14:22
Permalink
गझल आवडली.
गझल आवडली.
अलार्म लावुन निवांत झोपी जातो आपण
किती भरोसा असतो अपुला रातीवरती...
वैभव देशमुख
शुक्र, 19/09/2014 - 14:23
Permalink
गझल आवडली.
गझल आवडली.
अलार्म लावुन निवांत झोपी जातो आपण
किती भरोसा असतो अपुला रातीवरती...