पाहिले चालून त्याच्या सोबतीने

पाहिले चालून त्याच्या सोबतीने
मात्र केला घात काळाच्या गतीने

प्रेम ताटातूट वा खोटा अबोला
काय जे होईल...... होवो संमतीने

टाळतो सल्ले स्वतःचे मीच आता
बोल माझ्याशी जरा माझ्यावतीने

वाटले नव्हते असे उलटेल सारे
मी तुला जे जे म्हणालो गंमतीने

भेटवस्तू तर परत केल्यास सार्‍या
काळही देशील ना तो फुरसतीने

-'बेफिकीर'!

गझल: 

प्रतिसाद

पाहिले चालून त्याच्या सोबतीने
मात्र केला घात काळाच्या गतीने

प्रेम ताटातूट वा खोटा अबोला
काय जे होईल...... होवो संमतीने

मस्त शेर आहेत

प्रेम ताटातूट वा खोटा अबोला
काय जे होईल...... होवो संमतीने
व्वा !

भेटवस्तू तर परत केल्यास सार्‍या
काळही देशील ना तो फुरसतीने
सुंदर शेर :)

बोल माझ्याशी जरा माझ्यावतीने

हाही खूप आवडला

सर्व गझल आवडली. विशेषतः पहिला, चौथा आणि पाचवा.

टाळतो सल्ले स्वतःचे मीच आता
बोल माझ्याशी जरा माझ्यावतीने
मस्त. सगळी गझल चांगली झाली आहे.ह्या शेरावरून मला माझा एक वेगळा शेर आठवला. तो असा -
फारसे होणार नाही साध्य काही
खूप मी समजावले आहे मनाला

पाहिले चालून त्याच्या सोबतीने
मात्र केला घात काळाच्या गतीने

अप्रतिम मतला आहे !

sarvaanchaa aabhaaree aahe.

मस्त मस्त ....मतला अन सल्ला लय आवडले

सगळे शेर आवडले