द्वैत जन्मातले सरे बंधो...

हट्ट माझा तुझा पुरे बंधो
काळ देईल उत्तरे बंधो

काळ बुजवून टाकतो वाटा
कोण कोणास विस्मरे बंधो

देव जाणे व्यथा कुणाची ही
आतल्या आत पाझरे बंधो

कोण फिरवेल हात मायेचा
ठेव बांधून लक्तरे बंधो

एक बेअंत धून दाटू दे
द्वैत जन्मातले सरे बंधो ....गझल: 

प्रतिसाद

पहिला शेर छान आहे.

हट्ट माझा तुझा पुरे बंधो
काळ देईल उत्तरे बंधो

देव जाणे व्यथा कुणाची ही
आतल्या आत पाझरे ...
 
ही आवडलेहट्ट माझा तुझा पुरे बंधो
काळ देईल उत्तरे बंधो
वा. शेर अगदी समयोचित आहे.

कोण फिरवेल हात मायेचा
ठेव बांधून लक्तरे बंधो
वाव्वाव्वा...फारच आवडला हा शेर....

काळ आणि लक्तरे हे शेर अतिशय आवडले!

हट्ट माझा तुझा पुरे बंधो
काळ देईल उत्तरे बंधो

काळ बुजवून टाकतो वाटा
कोण कोणास विस्मरे बंधो

देव जाणे व्यथा कुणाची ही
आतल्या आत पाझरे बंधो

कोण फिरवेल हात मायेचा
ठेव बांधून लक्तरे बंधो

एक बेअंत धून दाटू दे
द्वैत जन्मातले सरे बंधो ....

सर्वच उत्तम.

गझल छाणच आहे. पण बेअंत उर्दु आहे. ग़ज़ल उर्दु प्रभावाखालची वाटते.

होय बेअंत उर्दूत वापरला जातो..त्यातही अंत संस्कृतातला आहेच की..भाषिक देवाण्घेवाण जुनीच प्रक्रिया आहे...बाकी उर्दू प्रभावाबद्द्ल आणखी मार्गदर्शन  :)  करावे ! शिवाय ' ग़ज़ल ' हा शब्द नेमक्या ़ कुठल्या लिपीतील आहे , ते ही सांगावे !

मुलगी आईसारखी दिसतेच. पण ती स्वतः वागते कशी, राहते कशी, बोलते कशी, सासरी नांदते कशी हेही बघितले पाहिजे मख्मूर मियाँ. बाण आहे म्हणुन सोडु नये.

अनंत,
अप्रतिम गझल.. सर्व शेर आवडले..
अनिरुद्ध