तुझ्यासारखे वाचता येत नाही

तुझ्यासारखे वाचता येत नाही
मला माणसा परखता येत नाही

तुझ्यासारखी सहजता येत नाही
मला नेमके बोलता येत नाही

नको आज आणूस डोळ्यात पाणी
मला आजही पोहता येत नाही

तुझा राहुदे हात हातात माझ्या
मला एकटे चालता येत नाही

जरी लागतो रोज जयदीप माझा
तुझ्यासारखे तेवता येत नाही

----- जयदीप

गझल: 

प्रतिसाद

तुम्ही छान स्वच्छ लिहिता. पण त्यापलिकडे जायला हवे.

सर ... __/\__.

प्रयत्न करतो आहे.

इथे गझल प्रकाशित करण्यात झालेला आनंद आणि अभिमान अवर्णनीय आहे.

धन्यवाद सर.