चोर

चोर आपल्या मनातले तू कुठे कधी अन कसे लपवशिल
किती जरी मुखवटे ओढले ते तुजला नक्की ओळखतिल

कट माझ्या म्रुत्यूचा त्यांच्या गोटामध्ये शिजवत होते
मी दिसल्यावरती ओरडले,तू तर शंभर वर्षे जगशिल

त्यांचे हसणे पहावयाचे असले तर मी दु:खी होतो
मी हसताना दिसलो तर मग निश्चित ते सारे हळहळतिल

सावधानता बाळगतो मी जेव्हा तेव्हा दगाच होतो
आलबेल असते सारे जेव्हा मी असतो खुशाल गाफिल

नको उभारु स्मारक,पुतळे,इमले तुझिया आठवणींचे
तू जाशिल "कैलास"निघोनी तुझी अक्षरे इथेच असतिल

-- डॉ.कैलास गायकवाड

गझल: 

प्रतिसाद

त्यांचे हसणे पहावयाचे असले तर मी दु:खी होतो
मी हसताना दिसलो तर मग निश्चित ते सारे हळहळतिल

vaa! gazal aavadalee.

वाह डॉक.
सावधानता बाळगतो मी जेव्हा तेव्हा दगाच होतो
आलबेल असते सारे जेव्हा मी असतो खुशाल गाफिल क्या बात है !

२ रा छान. ३ रा आणखी छान.

शंभर वर्ष एक नंबर