गझल

कारण काही नाही पण, मन उदास झाले आहे
हा अनाथ धुरकटला क्षण, मन उदास झाले आहे

भेटेन एकदा म्हणतो, मृत्यूच्यापार तुला मी
दरम्यान युगांताचे रण, मन उदास झाले आहे

एकेक मोजतो आहे, की कसे बळावत गेले
जन्माचे विस्कटलेपण, मन उदास झाले आहे

उर्वरिता रिक्ता त्याज्या, मिळतील तुला ही नावे
हे दुनियेचे दानीपण, मन उदास झाले आहे

हे प्रवाहगामी जीवन, ही अनुगमनांची कथने
दशकांवर काळाचे वण, मन उदास झाले आहे

अनंत ढवळे

गझल: 

प्रतिसाद

कारण काही नाही पण, मन उदास झाले आहे
हा अनाथ धुरकटला क्षण, मन उदास झाले आहे
वा. मस्त मतला. वरची ओळ फार सहज आली आहे.

उर्वरिता रिक्ता त्याज्या, मिळतील तुला ही नावे
हे दुनियेचे दानीपण, मन उदास झाले आहे
वा. क्या बात है.

हे प्रवाहगामी जीवन, ही अनुगमनांची कथने
दशकांवर काळाचे वण, मन उदास झाले आहे
मस्त वेगळाच पोत आहे दोन्ही शेरांना.

आणि 'युगांताचे रण' देखील विशेष.

Chittaranjanshee Sahamat! Gazal faar aavadalee. As usual, the 'BHASHASHAILEE' of this gazal too, is enviable.

-'Befikeer'!

अस्फूट असे लावण्य आहे ह्या गझलेला

शिकावे असे तर खूप काही ; नेहमीप्रमाणे
बेफीजी व चित्तरंजऩजींशी सहमत

सगळे शेर आवडले

मतला खूप आवडला.

Apratim

गझल आवडली.

युगांताचे रण, जन्माचे विस्कटलेपण, काळाचे वण - जबरदस्त!

खूप छआन !

अप्रतिम !
गझल आवडली.

भेटेन एकदा म्हणतो, मृत्यूच्यापार तुला मी
दरम्यान युगांताचे रण, मन उदास झाले आहे

वा..!

गझल आवडली .

भेटेन एकदा म्हणतो, मृत्यूच्यापार तुला मी
दरम्यान युगांताचे रण, मन उदास झाले आहे

वाह !! वाचावं आणि शुन्यात हरवून जावं असं काहीतरी .

व्वाह सर!!!

रण आणि दानीपण सर्वांत जास्त आवडले सर

धन्यवाद

:)

रण, विस्कटलेपण, दानीपण, वण vaah vaa vaa ! nishabd !!