गझल - अनंत ढवळे

एक औदासिन्य मागे राहिले
शेवटी हे शुन्य मागे राहिले

पांगले सर्वत्र निष्ठांचे धनी
आपले सौजन्य मागे राहिले

वाहुनी गेली किती संवत्सरे
केवढे मालिन्य मागे राहिले

संपले सौहार्द्र संबंधातले
कोरडे पर्जन्य मागे राहिले

घेउनी जा मृत्तिकेचा गंध या
राहू दे जे अन्य मागे राहिले


अनंत ढवळे
गणयोगी अपार्टमेंट्स
साई पॅलेस लेन
वडगाव (बु.)
पुणे-४११ ०४१
भ्रमणध्वनी - ९८२३०८९६७४


गझल: 

प्रतिसाद

मागे राहिले हा रदीफ ताकदीने निभावला आहे.
सुंदर गझल.

वा! वा! एक गझल मनात घर करणारी.
खर्जातली.
 
 

मुशायर्‍याची तयारी करताना ही गझल आढळली.

व्वा!

उत्तम गझल अनंतराव!

संपले सौहार्द्र संबंधातले
कोरडे पर्जन्य मागे राहिले

घेउनी जा मृत्तिकेचा गंध या
राहू दे जे अन्य मागे राहिले
व्वा! व्वा!

सध्या मुंबईत असलो तरी माझं घर माणिकबागेत आहे..
एकदा अवश्य भेटूया!

सुंदर गझल.

ही गझल पोस्ट करून तब्बल तीन वर्षं झालिएत ! आता पत्तादेखील बदलला आहे :-)

कोरडे पर्जन्य - छानच.

खुप आवडली. कोरडे पर्जन्य, मृत्तिका जवळचे वाटले.

वाहुनी गेली किती संवत्सरे
केवढे मालिन्य मागे राहिले

घेउनी जा मृत्तिकेचा गंध या
राहू दे जे अन्य मागे राहिले

संपुर्ण गझल सुंदर!!!

व्वा पर्जन्य , मृत्तिका मला पण आवडले हे दोन शेर