आज ही वेदना दार ठोठावते.....
आजही  वेदना  दार  ठोठावते
ज़ख्म  ओली  जुनी  फार  लोभावते.....
औषधांचा  मला  काय  हो  फायदा ?
मीठ  माझी  ज़खम  फार  गोंजारते.....
तू  न  येणार  हे  जाणतो  मी  तरी
सारखी  ही  नज़र  फार  घोटाळते.....
हो  तुझे  रूप  आहेच  लोभावणे !
त्या  मुळे  मन  असे  फार  लोभावते.....
तू  मला  जीव  लावू  नको  फारसा
ह्या  सुखालाच  मन  फार  सोकावते.....
बाग  माझा  जरी  पार  वैराण  हा !
पालवी  एक  का  फार  लोभावते ?
एक  घावा  निशी  जीव  जावा ` ख़लिश '
पण  मला  वेदना  फार  लोभावते.....
` ख़लिश '-विठ्ठल घारपुरे / १२-०८-२००९
गझल: 
 
      
प्रतिसाद
चित्तरंजन भट
गुरु, 13/08/2009 - 23:20
Permalink
पहिल्या ३ द्विपदी छान आहेत.
पहिल्या ३ द्विपदी छान आहेत. आवडल्या. लोभवाणे म्हणजे लोभसवाणे काय?
भूषण कटककर
शुक्र, 14/08/2009 - 00:35
Permalink
खलिश, आपण गझलेची 'जमीन'
खलिश,
आपण गझलेची 'जमीन' पाळलेली नाहीत.
मराठीत 'ती बाग' आहे.
घावा निशी - हा एक शब्द असावा.
दुसर्या व तिसर्या शेरातील 'हो' हा शब्द भरतीचा वाटतो. तिसर्या शेराचा आशय आवडला.
चित्तरंजन यांनी विचारलेला प्रश्न मलाही पडला. 'लोभावणे' म्हणजे काय?
मतल्यातील जमीन पाळायला हवी.
भूषण कटककर
शुक्र, 14/08/2009 - 00:47
Permalink
जख्म? जख्म हा शब्द आपल्याला
जख्म?
जख्म हा शब्द आपल्याला वृत्तानुसार 'जखम' असा लिहिता येईल असे म्हणावेसे वाटले, बाकी आपली इच्छा!
खलिश
शुक्र, 14/08/2009 - 15:24
Permalink
माननीय चित्तरंजनजी आणी
माननीय चित्तरंजनजी आणी भूषणजी, धन्यवाद.
" हो तुझे रूप आहेच लोभावणे ! "
*लोभावणे हे मी लोभनीय/लोभसवाणे ह्या पर्याय रुपी घेतले आहे. ` गोजिरे' घेउ शकलो असतो. मूळ मिसरा असा होता.
" का तुझे रुप आहे असे गोजिरे ?
त्या मुळे मन असे फार लोभावते....."
*-हा शेर जास्त योग्य असल्यास तोच ठेवुया....
**`हो' शब्द जरी भरतीचा वाट्त असला तरी :
- मिसर्याचा मूळ भाव जपण्या साठी वापरला आहे.
*** ' ज़ख्म ' आणी ` ज़खम ' हे मी अनुक्रमे " गा ल गा ( फ़ा (इ) लुन )
वज़न धरुन ठेवण्या साठी वापरले.
****
" बाग माझा जरी पार वैराण हा !"
हे
' बाग माझी जरी पार वैराण ही !' असे चालु शकले असते. पणः
बाग हे m & f ( masculine and feminine gender ) वापरु शकत असल्या मुळे तसे वापरले आहे.
आपली सूचने आवश्यक आहेत.
लोभ असावा.
` ख़लिश '- वि. घारपुरे.१४-०८-२००९.
भूषण कटककर
शनि, 15/08/2009 - 06:56
Permalink
जमीन - ठोठावते व लोभावते हे
जमीन - ठोठावते व लोभावते हे 'मतल्यात' आल्यानंतर पुढील शेरांमध्ये फक्त 'आवते'च यायला हवे असे बाराखडीत म्हंटले आहे. याची दखल विश्वस्तांनी घेतली नाही हा भाग वेगळा! पण, गोंजारते व घोटाळते हे कवाफी ... 'या' ... 'मराठी' गझलेत चालू शकणार नाहीत, असा माझा समज आहे.
कवीचे स्वातंत्र्य आहेच!
विश्वस्त
रवि, 16/08/2009 - 22:09
Permalink
खलिश, मतल्यात स्थापित
खलिश, मतल्यात स्थापित झालेल्या अलामतीनुसार योग्य ते बदल करावेत. किंवा मतल्यात बदल करावेत. धन्यवाद.