दुकाने
Posted by मिलिंद फणसे on Monday, 16 April 2007अपुले मला म्हणावे आता तरी सुखाने
ग्राहक बनून फिरलो त्याची किती दुकाने
गझल:
कसले माझे ? कुठले अपुले ? ते परकेच निघाले !
ज्यांनी धीर दिला , ते माझे कोण न जाणे होते ?
गझल
अपुले मला म्हणावे आता तरी सुखाने
ग्राहक बनून फिरलो त्याची किती दुकाने
तू मनापासून कर मज याद...मी आहे तिथे !
घाल केव्हाही मला तू साद...मी आहे तिथे !
शब्द माझे एवढे करतील आता
माझियावाचूनही तरतील आता
आजच्यापुरता पुरेसा ध्वस्त झालो
भावनांचे पूर ओसरतील आता
ऊर बडवू लागले सदरे सुखाचे
वेदना मौनात वावरतील आता
माणसांशी जवळचे नाते निघाले
श्वापदे कोणांस घाबरतील आता?
व्यापले आभाळ आता तारकांनी
झोपड्या दारिद्र्य पांघरतील आता
मारण्याआधीच केले माफही मी
काय तुमचे हात थरथरतील आता?
जाहले शिंपून माझे रक्त सारे
ताटवे बहुतेक मोहरतील आता
आणखी नाहीत जगल्याचे पुरावे
फक्त हे डोळेच पाझरतील आता