शरपंजर

बाजाराचा ओसरला भर
उजाडले, पदराला सावर


काठ्यांच्या गर्दीत विसरता
गोवर्धन "त्या" करंगळीवर


नीळकंठ व्हा पुन्हा शंकरा
मासे तडफडती काठावर


का प्रश्नांना नसते उत्तर?
पुन्हा प्रश्न, मी पुन्हा निरुत्तर!


हाय सुखांचे हे शरपंजर
लढणे सरले, उरली घरघर...

गझल: 

प्रतिसाद


का प्रश्नांना (प्रश्नाला) नसते उत्तर?
पुन्हा प्रश्न, मी पुन्हा निरुत्तर!
हाय सुखांचे हे शरपंजर
लढणे सरले, उरली घरघर...
दोन्ही शेर  अ प्र ति म...
पुलस्ती, फार आवडली गझल. शुभेच्छा.
काठ्यांच्या  गर्दीत... हा शेर पुरेसा स्पष्ट झाला नाही.
 
 

का प्रश्नांना नसते उत्तर?
पुन्हा प्रश्न, मी पुन्हा निरुत्तर!
 
फारच छान शेर!

का प्रश्नांना नसते उत्तर?
पुन्हा प्रश्न, मी पुन्हा निरुत्तर!
फार आवडला...

बाजाराचा ओसरला भर
उजाडले, पदराला सावर

का प्रश्नांना नसते उत्तर?
पुन्हा प्रश्न, मी पुन्हा निरुत्तर!हाय सुखांचे हे शरपंजर
लढणे सरले, उरली घरघर...

हे शेर फार आवडले आणि गझलही.

सहमत! छोटा बहर मस्त!
जयन्ता५२