पत्रे

शेकडो होती तुला मी धाडली पत्रे
सांग, त्यापैकी किती तुज भेटली पत्रे

आसवे उबदार पडली कागदावरती
अक्षरे भडकून गेली, पेटली पत्रे

एकदाही एकटेपण वाटले नाही..
नेहमी होती उशाला ठेवली पत्रे

वाकडातिकडा नसावा शब्द यासाठी
धाडण्यापूर्वी स्वतःची वाचली पत्रे

अर्थ जाणवला नवासा भूतकाळाचा
खूप दिवसांनी नव्याने चाळली पत्रे

गझल: 

प्रतिसाद

आसवे उबदार पडली कागदावरती
अक्षरे भडकून गेली, पेटली पत्रे

अर्थ जाणवला नवासा भूतकाळाचा
खूप दिवसांनी नव्याने चाळली पत्रे
वा मस्त

एकदाही एकटेपण वाटले नाही..
नेहमी होती उशाला ठेवली पत्रे

वाकडातिकडा नसावा शब्द यासाठी
धाडण्यापूर्वी स्वतःची वाचली पत्रे

अर्थ जाणवला नवासा भूतकाळाचा
खूप दिवसांनी नव्याने चाळली पत्रे

-

भन्नाट, जबरी व मस्त!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

सुंदर!!!
२,३,५ अप्रतिम!!!

सुरेख गझल!

धन्यवाद.

एकदाही एकटेपण वाटले नाही..
नेहमी होती उशाला ठेवली पत्रे

अर्थ जाणवला नवासा भूतकाळाचा
खूप दिवसांनी नव्याने चाळली पत्रे

वाव्वा.. फारच सुरेख.
गजल आवडली, केदार.

अतिशय अप्रतीम

एकदाही एकटेपण वाटले नाही..
नेहमी होती उशाला ठेवली पत्रे.............खूप आवडली!

अर्थ जाणवला नवासा भूतकाळाचा
खूप दिवसांनी नव्याने चाळली पत्रे

शेकडो होती तुला मी धाडली पत्रे
सांग, त्यापैकी किती तुज भेटली पत्रे

वा. गझल साधी, सरळ, सहज आणि सुरेख आहे.

वाह! चांगली गझल आहे.

धन्यवाद..सर्वांना.

सही है...

अप्रतिम,मोहक गझल.
नवासा, नसावा...मस्त.