वाटते बोलायचे राहून गेले

वाटते बोलायचे राहून गेले

आपले गाणे पुन्हा गाऊन गेले
भेटले जे,ते चुना लावून गेले

हे फुकट आहे कळाले त्यांस जेव्हा,
पोट भरलेले,तरी खावून गेले

विश्वसुंदर स्त्री करी अद्भूत किमया
आंधळे आले ,तिला '' पाहून '' गेले

मतलबी झालो इथे मी, काल जेव्हा
आप्त माझे पाठ मज दावून गेले

माफ केले पाप ते सारे तुझे मी
आसवांसमवेत जे वाहून गेले

पक्ष कसले?काय्?हे कळते न ज्यांना,
आपला झेंडा इथे लावून गेले

जाहले '' कैलास '' सारे सांगुनी पण,
वाटते,'' बोलायचे राहून गेले ''

डॉ.कैलास गायकवाड

गझल: 

प्रतिसाद

यावेळी एक शेराची स्तुती करायची गरज नाही.
झाडुन सगळी गझल फाडू आहे.

पक्ष कसले?काय्?हे कळते न ज्यांना,
आपला झेंडा इथे लावून गेले

पक्ष कसले?काय्?हे कळते न ज्यांना,
आपला झेंडा इथे लावून गेले

कैलास गांधी,हणमंतराव... खूप खूप धन्यवाद.

डॉ.कैलास

वा कैलासजी,
आजच पाहिली.आपल्या मताप्रमाणे मागच्या गझलेची त्रूटी या गझलेत भरून काढलीत खरोकर.
मतल्यात 'चुना लावणे' ही म्हण खरेच सार्थ केली.

बाकी ह बां च्या म्हणण्याला माझा दुजोरा आहे.

गझल आहेच छान हो....

पण
विश्वसुंदर स्त्री करी अद्भूत किमया
आंधळे आले ,तिला '' पाहून '' गेले

हे कशाला घालायच मधे... इतर शेर कसे मुड देतात....हा सामान्य वाटतो.
शुभेच्छा!

धन्यवाद निलेश....... खूप आभार..

बापू....
आपले म्हणणे रास्त आहे...... हा शेर सामान्यच आहे....... आमच्या नेरुळ शे जारी एक '' उलवे'' नावाचे गाव आहे.....एकदा सुश्मिता सेन शुटींगसाठी तिथे आली होती.... तोबा गर्दी उसळली होति.... आणि आश्चर्य म्हणजे गावातील २ अंध व्यक्ती शुटींग '' पाहण्या''साठी आल्या हो त्या..... अर्थात शुटींगचा वृत्तांत दुसर्‍याला विचारूनच जाणून घेत होत्या...... यातून हा शेर जन्मला.....असो... प्रतिसादाबद्दल आपले खूप आभार.

डॉ.कैलास

आपले गाणे पुन्हा गाऊन गेले
भेटले जे,ते चुना लावून गेले

हे फुकट आहे कळाले त्यांस जेव्हा,
पोट भरलेले,तरी खावून गेले

कैलासजी पुन्हा एकदा वाचली...अप्रतिम. दुसरा शेर प्रत्येक मंगल कार्यालयाबाहेर लिहायला हवा. खर्चात कपात होईल.

:)

धन्यवाद हबा

सुरेख, सुरेल गझल.

वा... डॉक्टर... मजा आली वाचून.

माफ केले पाप ते सारे तुझे मी
आसवांसमवेत जे वाहून गेले

फार छान आहे.

धन्यवाद अनिल्,धन्यवाद बहर,
धन्यवाद अजय जी.

डॉ.कैलास