सांग कसे ते कण्हतानाही गात असावे...

सांग कसे ते कण्हतानाही गात असावे...
दगडाखाली आयुष्याचे हात असावे!

दगडांवरती रेघोट्यांची नक्षी आहे...
रस्ता बनवत पाणी खाली जात असावे

उडतो आहे पक्षी तुटलेल्या पंखांचा
खूळ नवेसे त्याच्याही डोक्यात असावे..

डोहामध्ये..पडल्यावरती वलये इतकी ..
काय कळेना पानाच्या स्पर्शात असावे!

खोदत आहे आयुष्याला केव्हाचा तो
खाण कशाची आहे.... त्याला ज्ञात असावे

जयदीप

गझल: 

प्रतिसाद

वा. मस्त आहे गझल. सगळे शेर आवडले.

दगडांवरती रेघोट्यांची नक्षी आहे...
रस्ता बनवत पाणी खाली जात असावे

व्वा वा

छानच गझल, शुभेच्छा!

khup khup aabhaar.... :) ___/\___!!

छान गझल.

खाण विशेष

डोहामध्ये..पडल्यावरती वलये इतकी ..
काय कळेना पानाच्या स्पर्शात असावे!

फारच सुंदर कल्पना. हा चित्रशेर आहे.

खोदत आहे आयुष्याला केव्हाचा तो
खाण कशाची आहे.... त्याला ज्ञात असावे
................. अप्रतीम