रस्ता देतो

दगडामध्ये थोडे पाणी असते
बाबामध्ये थोडी आई असते

तो लिहितो ते समजत नाही आता
अश्रू हल्ली त्याची शाई असते

रस्ता देतो ....त्याला अडवत नाही
ज्याला माझ्यापेक्षा घाई असते

स्वप्न तुझे मी पाहत असतो तेव्हा
झोप उगाचच माझी जागी असते

जीव अडकल्यावरती सोडत नाही
आठवणींची असली जाळी असते

.....जयदीप

गझल: 

प्रतिसाद

वा. छान आहे गझल. सगळेच शेर आवडले. 'बाबामध्ये' >> ऐवजी 'बापामध्ये' वाचले.

दगडामध्ये थोडे पाणी असते
बाबामध्ये थोडी आई असते

फार छान शेर. . !

गझल आवडली .

मनापासून आभार सर...

:)

दगडामध्ये थोडे पाणी असते
बाबामध्ये थोडी आई असते........ 'बाप' शब्दप्रयोजनाबद्दल सहमत 'बाबा'च वापरायचा असेल तर 'बाबांमध्ये' जास्त रास्त ठरेल असे आपले एक वाटून गेले.

तो लिहितो ते समजत नाही आता
अश्रू हल्ली त्याची शाई असते......वा !

रस्ता देतो ....त्याला अडवत नाही
ज्याला माझ्यापेक्षा घाई असते....क्या बात ! फार आवडला हा शेर.

चुभूदेघे.

-सुप्रिया.

शेर आवडले, शुभेच्छा

मनापासून आभार....सुप्रिया जी , अनंत सर