कुणीच नव्हते आले निरोप देण्यासाठी ...

आई जेंव्हा जाता जाता रडली होती
काही  पाने वार्‍यावर  थरथरली होती

पुढ्यात होता आयुष्याचा उजाड वाडा
माझी छाया खिन्न मनाने बसली होती

वर्षांमागुन वर्षे विचार करतो आहे
चूक कुणाची , कशी कुठे ती घडली होती

अवती भवती जंगल होते नात्यांचे पण
जगण्यासाठी एक डहाळी पुरली होती

कुणीच नव्हते आले निरोप देण्यासाठी
माझ्यामागे धूळ जराशी उडली होती....

अनंत ढवळे..

 

 

 

 

गझल: 

प्रतिसाद

अ प्र ति म गझल....
सगळेच्या सगळे शेर आवडले...उत्तम...
शुभेच्छा, अनंतराव.

आई जेंव्हा जाता जाता रडली होती
काही  पाने वार्‍यावर  थरथरली होती

पुढ्यात होता आयुष्याचा उजाड वाडा
माझी छाया खिन्न मनाने बसली होती

अवती भवती जंगल होते नात्यांचे पण
जगण्यासाठी एक डहाळी पुरली होती

अतिशय सुंदर गझल... फार आवडली...

श्री.अनंतराव ढवळे..अंतरंग 'ढवळून' निघाले..आईचा शेर वाचून्..सगळेच शेर दर्जेदार्..वा!
-मानस६

पुढ्यात होता आयुष्याचा उजाड वाडा
माझी छाया खिन्न मनाने बसली होती

वर्षांमागुन वर्षे विचार करतो आहे
चूक कुणाची , कशी कुठे ती घडली होती

कुणीच नव्हते आले निरोप देण्यासाठी
माझ्यामागे धूळ जराशी उडली होती.... हे तिन्ही शेर अप्रतिम. कल्पना नवीन, रचना सहजसुंदर!अजब

क्या बात है|

अवती भवती जंगल होते नात्यांचे पण
जगण्यासाठी एक डहाळी पुरली होती

हा शेर अनेक दिवस मनात रेंगाळत राहील.

- डॉ.श्रीकृष्ण राऊत

 

 

आपल्या नव्या गझला वाचून  मझा आला. ढवळेसाब, या पारव्या-राखाडी कल्पना कुरतडत रहातात.
काय उच्च शेर सांगितलेत एकेक!
 

नानांशी सहमत! आपल्या गझलेतले वेगळेपण काही औरच आहे.

अप्रतिम गझल. क्या बात है. जगण्यासाठी एक डहाळी पुरली होती.

सर्वच शेर सुरेख आहेत. सुंदर गझल

जगण्यासाठी एक डहाळी पुरली होती......क्या ब्बात है!!! अप्रतिम गझल.

व्वा, सर्वच शेर आवडले

अतिशय सुंदर गझल

फार फार आवडली गझल
सगळेच शेर ख़ास !!!

क्लास क्लास एकदम ...संपूर्ण गझल आवडली

वर्षांमागुन वर्षे विचार करतो आहे
चूक कुणाची , कशी कुठे ती घडली होती >> व्वाह... व्वाह !!

अवती भवती जंगल होते नात्यांचे पण
जगण्यासाठी एक डहाळी पुरली होती >>>> क्या बात !!

ही गझल.... क्लास अपार्ट!

धन्यवाद सर !!

:)