नीट वाच...!

कविवर्य सुरेश भट यांचा आज (15 एप्रिल) जन्मदिन.
त्यांना विनम्र आदरांजली.
................................................................

............................................
नीट वाच...!
............................................

ही निष्कर्षाची कशास इतकी घाई ?
वेड्यात मला काढून शहाणा जाई...

हा काळ निर्दयी नागवतो सगळ्यांना...
आयुष्य न देई कशाचीच भरपाई

मज मधून येते जाग उदास सुरांनी...
कोणास्तव गाते रात्र मुकी अंगाई ?

मी जुनेच, सारे जुने आठवत बसतो...
मज जुनेपणाची कशास ही नवलाई ?

अद्याप न माझा शोध संपला माझा...
मी गवसत नाही मलाच माझ्या ठाई !

अश्रूंची पोरे पुन्हा पोरकी झाली...
मौनात मुसमुसे आकाशाची आई!

लागेल नव्याने अर्थ पुन्हा एखादा...
तू नीट वाच मी शिंपडलेली शाई!

- प्रदीप कुलकर्णी
.................................................

गझल: 

प्रतिसाद

ही निष्कर्षाची कशास इतकी घाई ?
वेड्यात मला काढून शहाणा जाई...
वाव्वा. मस्त मतला आहे. नवलाई, शाई...सगळेच शेर छान झाले आहेत.

मतला, नवलाई सुरेख आहेत. शिंपडलेली शाई पुन्हा पुन्हा वाचावा असा

बरेच शेर छान झालेत

नवलाई आणि मतला जे बात

लागेल नव्याने अर्थ पुन्हा एखादा...
तू नीट वाच मी शिंपडलेली शाई!

Sundar sher aani sundar gazal.

ही निष्कर्षाची कशास इतकी घाई ?
वेड्यात मला काढून शहाणा जाई..... वा !

अद्याप न माझा शोध संपला माझा...
मी गवसत नाही मलाच माझ्या ठाई !.....क्या बात !

लागेल नव्याने अर्थ पुन्हा एखादा...
तू नीट वाच मी शिंपडलेली शाई!........क्या केहेने !