किती?

मी करावा निवाडा जगाचा किती ?
कौल घ्यावा स्वतःच्या मनाचा किती ?

केशरी सांजवेळी, सकाळी निळे
माग काढू अशा अंबराचा किती ?

प्रेम सर्वांवरी खूप केले तरी
शेवटी राहिलो मी कुणाचा किती ?

ऐकली मी तुझ्या अंतरीची व्यथा
फायदा त्यात माझ्या मनाचा किती ?

हे तपासायचा लागला छंद की,
दोष माझा किती? प्राक्तनाचा किती?

गझल: 

प्रतिसाद

हे तपासायचा लागला छंद की,
दोष माझा किती? प्राक्तनाचा किती?
खरे आहे. वरच्या ओळीने मजा आली आहे. एकंदर मस्त.

धन्यवाद, चित्त.

फायदा त्यात माझ्या मनाचा किती ?

>>>ऐकली मी तुझ्या अंतरीची व्यथा
फायदा त्यात माझ्या मनाचा किती ?

vvaa

सर्व शेर खूप आवडले एकूण गझल खूप आवडली