पांडुरंगा

पांडुरंगा

का भक्त आज सलतो भगतास पांडुरंगा ?
का देव आज दिसतो धनिकास पांडुरंगा ?

अधिकार श्रेष्ठ ज्यांचा अध्यात्म सांगण्याचा
तो का सुखात ठेवी दु:खास पांडुरंगा ?

ही सावली मठांची ढोंगी पुन्हा निघाली
ना किर्तनासी यावे तूर्तास पांडुरंगा !

पाण्यात कोरडी ही आतून चंद्र्भागा
अभिषेक आसवांचा चरणास पांडुरंगा !

कुठल्या मुखात गाथा ? कोठे अभंग आता?
जो तो लाबाड हसतो संतास पांडुरंगा !

आता युगायुगांची चर्चा कशास व्हावी
प्रत्येक क्षण तुझा मज आभास पांडुरंगा !

प्रशांत वेळापुरे
पंढरपूर

गझल: 

प्रतिसाद

कुठल्या मुखात गाथा ? कोठे अभंग आता?
जो तो लाबाड(लबाड) हसतो संतास पांडुरंगा !

हा एक शेर आवडला!

ही सावली मठांची ढोंगी पुन्हा निघाली
ना किर्तनासी यावे तूर्तास पांडुरंगा !

चांगला शेर !

आता युगायुगांची चर्चा कशास व्हावी
प्रत्येक क्षण तुझा मज आभास पांडुरंगा !
छान! विशेषतः पहिली ओळ.

'ना किर्तनासी' ऐवजी 'ना कीर्तनास' हवे आहे असे वाटते.

ही सावली मठांची ढोंगी पुन्हा निघाली
ना किर्तनासी यावे तूर्तास पांडुरंगा !

पाण्यात कोरडी ही आतून चंद्र्भागा
अभिषेक आसवांचा चरणास पांडुरंगा !

कुठल्या मुखात गाथा ? कोठे अभंग आता?
जो तो लाबाड हसतो संतास पांडुरंगा !

या द्विपदी विशेष आवडल्या.

हबा ,ज्ञानेशजी,अजय जोशीजी,क्रांति
प्रतिसादा बद्दल व सुचनां बद्दल आभार,
प्रशान्त

ह बा ,ज्ञानेशजी,अजय अनंत जोशी जी,क्रान्ति
प्रतिसादा बद्दल, सुचनां बद्दल धन्यवाद

प्रशान्त वेळापुरे

चंद्रभागा विशेष आवडली.

नावीन्यपुर्ण अंत्ययमक व समर्थपणे सांभाळलेलेही!

गझल आवडलीच!

का भक्त आज सलतो भगतास पांडुरंगा ?

म्हणजे काय?

डॉ.कैलास

भगत = गुरव! भक्त = भाविक!

आमच्या जुन्या घरासमोरील महादेव मंदीरातील भगत अत्यंत तिरसट व उद्दाम असल्याने काही ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन त्याला एक दिवस खूप झापला. त्यानंतर तो सरळ झाला.

हा शेर त्या घटनेशी एकदम आयडेंटिफाय होणारा वाटला मला.

धन्यवाद!

प्रशान्त ...भन्नाट्...रे.........................

पांडुरंगा

का भक्त आज सलतो भगतास पांडुरंगा ?
का देव आज दिसतो धनिकास पांडुरंगा ?

अधिकार श्रेष्ठ ज्यांचा अध्यात्म सांगण्याचा
तो का सुखात ठेवी दु:खास पांडुरंगा ?

ही सावली मठांची ढोंगी पुन्हा निघाली
ना किर्तनासी यावे तूर्तास पांडुरंगा !

पाण्यात कोरडी ही आतून चंद्र्भागा
अभिषेक आसवांचा चरणास पांडुरंगा !

कुठल्या मुखात गाथा ? कोठे अभंग आता?
जो तो लाबाड हसतो संतास पांडुरंगा !

आता युगायुगांची चर्चा कशास व्हावी
प्रत्येक क्षण तुझा मज आभास पांडुरंगा !

प्रशांत वेळापुरे
पंढरपूर

धन्यवाद बेफिकिर

कैलास

गझल एकंदर छान. 'कीर्तनास' हवे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

चक्रपाणि,बेफिकीर ,कैलास ,दशरथयादव ,चित्तरंजन भट
प्रतिसादा बद्दल व सुचनां बद्दल आभार,
प्रशान्त

मस्त गझल...
एक शंका -

अधिकार श्रेष्ठ ज्यांचा अध्यात्म सांगण्याचा
तो का सुखात ठेवी दु:खास पांडुरंगा ?
या शेयाचा मी लावलेला अन्वय असा -
ज्यांचा अध्यात्म सांगण्याचा अधिकार श्रेष्ठ आहे, तो दु:खास सुखात का ठेवतो?

हा असाच अर्थ आणि अन्वय अपेक्षित होता का?
कारण मला मूळ कल्पनेतच शंका आहे... जर अध्यात्म सांगण्याचा अधिकार मोठा असेल, तर दु:खालाही सुखात ठेवणे (सहज) जमेल... त्यात प्रश्नार्थक असे काय आहे?

आणि जर मी अर्थ लावायला चुकत असेन, तर कृपया स्पष्ट करावे...

एक शंका -

अधिकार श्रेष्ठ ज्यांचा अध्यात्म सांगण्याचा
तो का सुखात ठेवी दु:खास पांडुरंगा ?
या शेयाचा मी लावलेला अन्वय असा -
ज्यांचा अध्यात्म सांगण्याचा अधिकार श्रेष्ठ आहे, तो दु:खास सुखात का ठेवतो?

हा असाच अर्थ आणि अन्वय अपेक्षित होता का?
कारण मला मूळ कल्पनेतच शंका आहे... जर अध्यात्म सांगण्याचा अधिकार मोठा असेल, तर दु:खालाही सुखात ठेवणे (सहज) जमेल... त्यात प्रश्नार्थक असे काय आहे?

नचिकेत,

दु:खाला सुखात ठेवणे म्हणजे म्हणजे दु:ख 'कायम' राहील हे 'एनशुअर' करणे! असा अर्थ मी घेतला.

आनंदयात्रीजी,बेफिकीर ,
अधिकार श्रेष्ठ ...हे आपण उपरोधनेही घेऊ शकतो,जे आपला संतापेक्षाही अधिकार श्रेष्ठ आहेत असे मानतात (त्या त्या काळातील प्रस्थपित), ते आपल्या दु:खाच्या बाबतीत लहान होतात,दु:खाचे भांडवल करतात !
धन्यवाद!
प्रशांत

आहाहा!
मस्त रचना!
खालील शेर भन्नाट.

ही सावली मठांची ढोंगी पुन्हा निघाली
ना किर्तनासी यावे तूर्तास पांडुरंगा !
(Realistic आहे)

पाण्यात कोरडी ही आतून चंद्र्भागा
अभिषेक आसवांचा चरणास पांडुरंगा !

कुठल्या मुखात गाथा ? कोठे अभंग आता?
जो तो लाबाड हसतो संतास पांडुरंगा !
(खरे आहे)
-----------------------------------------------------------------------नचिकेत भिंगार्डे